जाहिरातीसाठी संपर्क

दोन पिल्लं.

एकदा एक चिमणा चिमणी ला दोन पिल्लं झाली.

दोन पिल्लं


 दोघंही खूप गोंडस निरागस गुबगुबीत छान आपल्या घरट्यात चिमणा चिमणी च्या कुशीत हळू हळू मोठी होत गेली....त्यांना छान पंख फुटले आणि वेळ आली त्यांना आकाशात भरारी मारायची.....

त्यांच्या पैकी एक पिल्लू जरा आधी जन्माला आलेलं म्हणून थोडसं strong होतं. ते आकाशात उडायला खूप अधीर होतं. चिमणा चिमणी नी दोघंही पिल्लांना खूप प्रेमाने वाढवलं होतं. कधीही कुठल्याच पिल्लाला कमी पडू दिलं नव्हतं. पण दुसरं पिल्लू अजून थोडं लहान होतं, अजून त्याला घरट्यातंनं बाहेर पडावं वाटत नव्हतं. त्याला अजून थोडे दिवस त्याचा आई बाबा बरोबर घरट्यातच राहायचं होतं. पण उडायची वेळ तर जवळ येत गेली.


मोठं पिल्लू, कधी एकदा उडतोय अणि सगळं जग उंच आकाशातून खाली बघतोय असा विचार करत होतं. चिमणा चिमणी नी दोनही पिल्लांना सोबत शिकवायला सुरुवात केली. मोठं पिल्लू लगेच उडायला शिकलं अणि बघता बघता त्याने आकाशात उंच भरारी सुद्धा घेतली.... आपलं एक पिल्लू आकाशात छान उडू लागलय हे चिमणा चिमणीला कळले. चिमणा चिमणी नी आपल्या मोठ्या पिल्लाला उडायला येऊ लागलंय हे बघितलं आणि त्यांचा आनंद गगनात मावेना. चिमण्याची तर छाती गर्वाने फुलून गेली. चिमणीच्या तर डोळ्यात पाणीच आलं.

पण वेळ न दवडता चिमणा चिमणी छोट्या पिल्ला कडे जास्त लक्ष देऊ लागले. त्याला आपल्या बरोबर उडणार नाहीयेत कारण ते छोट्या पिल्लाला अजून उडायला शिकवतायेत. मोठं पिल्लू तसं समजदार होतं. ते स्वतः एकटच सगळी कडे झाडांवर, फुलांवर, नदी काठी, झर्यांवर उडून निसर्गाचा आनंद लुटू लागलं आणि आई बाबांनी लहान पणी जे जे शिकवलेल आहे त्याची शिदोरी घेऊन सगळं जग बघायला लागलं. 


खाली चिमणा चिमणी एक जुटीने आपल्या छोट्या पिल्ला कडे जास्तं लक्ष द्यायला लागले अणि ते पिल्लू हळू हळू शिकायला लागलं. त्याला सोबत म्हणून जसं जसं ते छोटं पिल्लू उडतय तिथे तिथे ते त्याच्या बरोबर उडू लागले. छोट्या पिल्लाला खूप मज्जा वाटू लागली की आपले आई बाबा पण आपल्या बरोबर उडतायेत. त्या गोष्टीने छोट्या पिल्लाची मनशक्ती वाढायला लागली..त्याच्या पंखात बळ आलं....


 चिमणा चिमणी आणि छोटं पिल्लू हे सगळी कडे सोबतच जाऊ लागले...एकत्र राहत गेले...


पुढे त्यांची भेट मोठ्या पिल्ला बरोबर झाली...मोठं पिल्लू आता त्याचे त्याचे उडायला शिकलेले. एकटं शिकत असताना वाटेत त्याची भेट अजून बऱ्याच दुसऱ्या मित्रांशी झाली आणि मोठं पिल्लू त्याच्या मित्रान सोबत छान मजेत उडू लागलं. हळू हळू त्याचे जग वेगळे होऊ लागले. चिमणा चिमणी बद्दल प्रेम, माया असून सुद्धा ते त्यांच्या बरोबर राहू शकले नाही.

हे बघून चिमणा चिमणी ल थोडं वाईट वाटलं.


 चिमणीला सगळे जण परत एकत्र उडायला हवे होते. तिला तिचे कुटुंब एकत्र राहावे असे वाटत होते. तिचं कुठे चुकतंय हेच तिला समजेना...कसं वागावं हेच उमजेना...तसं तिने मोठ्या पिल्लाला एकदा सांगितले. मोठ्या पिल्लाला मोठा प्रश्न पडला...त्याच काय अणि कुठे चुकतंय हेच त्याला उमजेना..... हि गोष्ट अपूर्णच आहे...


काय बरं करता येईल या गोष्टीचा सुखी शेवट?

हि गोष्ट अजून कोणाची नसून प्रत्येक घरा घरा मधली आहे. जिथे दोन पिल्लं आहेत त्यांची आहे हे तर तुम्हाला कळलंच असेल.


आई बाबा आपल्या दोन पिल्लान साठी ठरवून सुद्धा एक सारखी परिस्थिती निर्माण नाही करू शकत. प्रत्येकाची life journey ठरलेली आहे. त्याला त्या बऱ्या वाईट प्रसंगांचा सामना स्वतः करायचाय. आई वडील नेहमीच आपल्या मुलानं वर प्रेम माया करत त्यांना मोठे करतात.

पण ते करत असताना, थोडं मोठ्या पिल्ला कडे लक्ष अणि छोट्या पिल्लाला स्वातंत्र्य द्यायचा विसर पडतो आणि परिस्थिती जशी होती तशीच राहते.


हि गोष्ट बोध कथा नाही. कोणालाही बोध देण्या इतपत मी स्वतः ला अजिबातच मोठं समजत नाही. आजू बाजूची कुटुंब अणि मलाही दोन पिल्लं आहेत त्यांचा निरिक्षणातून हा लेख प्रपंच.

असो निरोप घेते!

-नीता वरघुडे

-सुनील इनामदार


Post a Comment

0 Comments