जाहिरातीसाठी संपर्क

Pune Fursungi Onion Seeds | पुणे-फुरसुंगी जातीचा कांदा लागवडीचा फायदा

पुणे-फुरसुंगी जातीची कांदा लागवड फायदेशीर.

🧅 पुणे-फुरसुंगी जातीच्या कांद्याची साठवण क्षमता अधिक असल्यानं हा कांदा योग्य वेळी बाजारात नेता येतो; तसंच या जातीच्या बियाण्याची कमतरता लक्षात घेता बीजोत्पादनातून फायदाही मिळू शकतो. 

 👳🏻‍♂️ कांदा बियाणाला खात्रीशीर बाजारभाव मिळत असल्यानं गेल्या तीन वर्षांपासून शेतकरी  या बियाणाचं उत्पादन घेताहेत.  


Pune Fursungi kanda biyane

पुणे फुरसुंगी कांदा 

🏞️ मध्यम ते भारी जमिनीत कांदा बीजोत्पादन चांगलं होते. क्षारयुक्त जमिनीत याचं उत्पादन चांगलं येत नाही. तसंच हलक्या अथवा मुरमाड जमिनीत कांदा बीजोत्पादन न घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या आणि मध्यम ते भारी जमिनीत कांदा बीजोत्पादन घेणं फायदेशीर ठरतं, असा शेतकरी बंधूनचा अनुभव आहे.

Pune Fursungi kanda biyane
 

 विक्रीसाठी आहे
🧅 Onion seeds available for sell🧅 कांदा बियाणे विकणे आहे* ......
घरगुती तयार केलेले  खात्रीशीर पंचगंगा नाशिक लाल, व पुना फूरसुंगी उन्हाळी (गावरान) कांदा बियाणे विक्री साठी उपलब्ध अधिक माहितसाठी🧅

📞संपर्क करा☎️
 मोनंबर :-9373132957
गणेश काळुंके,
ता.गंगापूर ,
जिल्हा.औरंगाबाद,
भाव. फोन वर  बोलू,
मो.9373132957  🧅🧅🧅🧅🧅


Pune Fursungi kanda biyane

🌱 लागवड

अशी केली बियाणं लागवड

सरासरी ७० ते ८० ग्रॅम वजनाचे साडेचार ते सहा सेंटिमीटर आकाराचे कांदे निवडले. १४-१५ रुपये किलो बाजारभावानं कांद्याची खरेदी केली. त्यासाठी १ लाख ५१ हजार २०० रुपये खर्च आला. कापलेल्या कांद्यामधून केवळ एक डोळ्याचे कांदे लागवडीसाठी निवडले. ९० बाय ३० सेंटिमीटर अंतरावर कापलेल्या कांद्याची लागवड केली. 

🧪 माती परीक्षण

माती परीक्षण करून सूक्ष्म द्रव्यांचा वापर केला. पिकाची गरज ओळखून औषध फवारणी केली. १० एकराकरिता एकूण १० लाख रुपये खर्च झाला. एकरी १५० किलो बियाणं आता त्यांना यातून मिळेल. सध्या या बियाणाला १२००-१५००  रुपये प्रती किलो याप्रमाणे बाजारभाव मिळतोय. त्यानुसार त्यांना खर्च वजा जाता १८ लाख रुपये नफा मिळेल. Pune Fursungi Onion Seeds

कांद्याचे बाजारभाव हे सतत पडत असल्यानं राज्यातला कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. मात्र या पुणे-फुरसुंगी जातीच्या कांदा उत्पादनात दुहेरी फायदा मिळू शकतो. एक तर याची साठवणक्षमता अधिक असल्यानं बाजारभाव असेल त्याच वेळी विक्रीकरिता काढता येतो. शिवाय अशा प्रकारे बीजोत्पादन अधिकचा फायदाही मिळवून देतं. त्यामुळं शेतकऱ्यांनी याचा विचार करावा.

Pune Fursungi kanda biyane


🧅 ३० वर्षांत ३३ जाती विकसित 

देशात गेल्या ३० वर्षांत जवळपास ३३ जाती विकसित होऊन देखील अजूनही कांदा क्षेत्र विकसित होऊ शकलेलं नाही. शेतकऱ्यांना चांगलं वाण आजही मिळेनासं झालं आहे. पुणे-फुरसुंगी ही साठवणक्षम जातही त्याला अपवाद नाही. लागवड जसजशी वाढेल, तसतसा हा प्रश्न निकालात निघेल, असा तज्ज्ञांना विश्वास आहे.

शेतिरिलेटेड जाहिरातीसाठी संपर्क-9766258543


Post a Comment

0 Comments