Jamin Mojani Bhumiabhilekh
Jamin Mojani Bhumiabhilekh |
➤ शेतजमिनीचे वाद कमी होण्यास मदत
➤ अचूक मोजणीमुळे तक्रारी कमी होणार
➤ कॉर्स यंत्रणेचा मोठ्या प्रमाणावर वापर
जीपीएस रीडिंगचे फायदे
● सर्व्हे ऑफ इंडियाला देशाच्या नवीन नकाशासाठी मदत होणार
✓ जीपीएस रीडिंग अचूक येणार जलद गतीने मोजणी होण्यास मदत होणार
✓ जमिनीचे पोटहिस्से करणे सोपे होणार
✓ अनेक जणांच्या विक्री गैरप्रकाराला आळा चुकीची हद्द दर्शविण्यास आळा बसणार
अनेकवेळा ग्रामीण भागात शेतजमिनी, बांधावरून वाद होत असतात. सुरू झालेले हे भांडण कधी न्यायालयात पोहचते, हेसुद्धा समजत नाही. अशावेळी शेतजमीन अचूक मोजली असेल, तर वाद उद्भवण्याचा प्रश्नच राहणार नाही. यासाठी भूमिअभिलेख विभागाने आता जमीन मोजणीचे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामुळे जमिनीची मोजणी केवळ अर्ध्या तासात आणि अतिशय काटेकोरपणे, तीही अगदी झटपट होणार आहे. त्यासाठी राज्यात 'कॉर्स' ही यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. { 'Jamin Mojani Bhumiabhilekh' }
जमिनीची अचूक आणि कमी वेळेत मोजणी करण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने राज्यात ७७ ठिकाणी कॉर्स ( "कंटिन्युअस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन" ) उभारले आहे. या कॉर्स आधारे जीपीएस रीडिंग केवळ ३० सेकंदांत घेता येणार आहे. या सुविधेमुळे जमिनीची मोजणी अत्यंत कमी वेळात आणि अचूक होणार आहे.
या तंत्रज्ञानाचा वापर प्रायोगिक तत्त्वावर भूमिअभिलेख विभागाकडून हवेली तालुक्यात सुरू झाला आहे. या तंत्रज्ञानामुळे पाच एकर क्षेत्र मोजण्यासाठी केवळ अर्धा तास लागणार आहे. जमीन मोजणीसाठी सध्या भूमिअभिलेख विभागाकडून ईटीएस मशिनच्या साहाय्याने मोजणी करण्यात येते. जागेवर जीपीएस रीडिंग घेऊन त्या क्षेत्राचे अक्षांश व रेखांश घेतले जातात.
⇨ E-Jamin Mojani Bhumiabhilekh
राज्य शासनाच्या भूमिअभिलेख विभागाच्या वतीने आणि सर्व्हे ऑफ इंडियाच्या सहकार्याने 'कॉर्स' या आधुनिक तंत्रज्ञानाचा जमिनीची मोजणी करण्यासाठी वापर करण्यास सुरुवात झाली आहे. कॉर्सच्या आधारे जीपीएस रीडिंग केवळ ३० सेकंदांत घेता येते. त्यामुळे मोजणीच्या कामासाठी लागणारा अनेक दिवसांचा कालावधी अत्यंत कमी होऊन तो केवळ अर्ध्या तासावर येणार आहे. या कमी कालावधीमुळे दिवसभरात किमान तीन ते पाच मोजणीची कामे पूर्ण करणे शक्य होणार आहे. पुढील काळात जमिनीच्या मोजणीसाठी कॉर्स ही यंत्रणा उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. { "Jamin Mojani Bhumiabhilekh" }
हेही वाचा
➥ राज्यातील उर्वरित २८ जिल्हयातील भूमापन नकाशांचे डिजीटायझेशन
0 Comments
🚫 Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Please do not enter any spam links in comment box