महाराष्ट्र पोलीस भरती नवींन जाहिरात 2022-Post -14956 | Police Bharti vacancy Post GR @Maha Digital
विषय - सन २०२१ पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदभरती
उपरोक्त विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, सन २००९ पोलीस शिपाई रिक्त पदांची माहिती या कार्यलयास सादर करण्यात आलेली आहे. सन २०२१ ची रिक्त असलेली यह अरण्याकरिता जाहिरात देण्याबाबतचा विहित नमुना सोबत जोडला आहे. त्यानुसार खालील घटक प्रमुखांनी जाहिरात तयार करून सदरची जाहिरात दिनांक ०२.१२.२०१२ ह्या दिवशीच्या वर्तमानपत्रात देण्यात यावी व या कार्यालयास ई-मेल द्वारे कळविण्यात यावे
राष्ट्र शिपाई नियम, २०११ ल्या आणि दिनांक २३.६.२०१२ च्या नियम केलेल्या सुधारीत तरवार पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षक (संबंधीत पोलीस नांवांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई (संबंधीत घटक प्रमुखांनी त्यांच्या आस्थापनेकडून भरण्यात येत असलेल्या पदाचा उल्लेख करावा) यांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे दिनांक ०३.११.२०१२ ते ३०.११.२०१२ या कालावधीत स्विकारण्यात येतील. ह्या बाबतची सविस्तर माहिती policerecruitment2022.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर उमेदवारांच्या माहितीकरिता प्रसिद्ध करण्यात आली आहे.
उमेदवारास पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल. ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे.
☛ येथे क्लिक करा ☜
उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करु शकत नाही. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल. पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा घेण्यांत येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा हो पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यांत येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.
भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारिरीक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या १.१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधुन एक गुणवत्तायादी तयार केली जाईल. तात्पुरत्या निवडसूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवडसूचीमध्ये समावेश केला जाईल निवडसूचीतील उमेदवाराची निवड तात्पुरती (Provisional selection) असेल निवडसूचीमध्ये उमेदवाराच्या नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येवू नये. शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रिकरण केल्यानंतर, गृहविभाग शासन निर्णय दि.१०.१२.२०२० नुसार अंतिम गुणवत्तायादी तयार करण्यात येईल.
0 Comments
🚫 Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Please do not enter any spam links in comment box