अनाथांची माय हरपली..!
Sindhutai Sapkal ︱Indian social worker
https://www.mahadigitalmagzine.com/2022/01/sindhutai-sapkal-1948-2022.html
Sindhutai Sapkal |
कष्ट उपसले, सततचा दुस्वास सोसला मात्र चेहऱ्यावरचे हसू त्यांनी मिटू दिले नाही. त्यांच्या जाण्याने अनेक निराधारांच्या आयुष्यातील मायेची सावली हरपली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली अर्पण केली. सिंधुताई यांना गेल्यावर्षी 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्र सरकारकडून त्यांना २०१२ मध्ये 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण' पुरस्कार देण्यात आला होता.('Sindhutai Sapkal') तत्पूर्वी, २०१० साली त्यांना महाराष्ट्र सरकारच्या 'अहिल्याबाई होळकर पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताई यांना ७५० वर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील पुरस्कार मिळाले आहेत.
सिंधुताईंचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे झाला. मुलगा हवा असताना मुलगी झाली म्हणून सिंधुताई यांचे नाव चिंधी ठेवण्यात आले. गरिबीमुळे त्यांचे चौथीपर्यंतच शिक्षण होऊ शकले आणि वयाच्या ९ व्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेले श्रीहरी सपकाळ यांच्याशी त्यांचे लग्न लावून देण्यात आले. पुढे त्या गर्भवती असताना पतीने घरातून हाकलून दिले. एका गोठ्यात त्यांनी मुलीला जन्म दिला. भीक मागितली आणि अनेक संघर्षातून पुढे अनाथ बालकांसाठी पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. इथून त्यांचे समाजकार्य सुरू झाले. (Sindhutai Sapkal)
त्यांच्या आयुष्यावर 'मी सिंधुताई सपकाळ' हा मराठी चित्रपटही निघाला होता. सिंधुताईंच्या निधनामुळे सेवाव्रती आणि समर्पित व्यक्तिमत्व काळाने हिरावून घेतले. त्यांचा प्रवास थांबला असला तरी सिंधुताईंनी सुरू केलेला सेवा यज्ञ कायम तेवत •ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही सिंधुताईंना श्रद्धांजली अर्पण केली. अनाथ मुलांची मायेची सावली कायमची हरपली, असे ते म्हणाले.
सिंधुताईंना मिळालेले महत्वाचे पुरस्कार :
➤ पद्मश्री पुरस्कार (2021 )
➤ डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (2017)
➤ प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (2015)
➤ मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (2013)
➤ महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (2012)
➤ सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला 'रिअल हीरो पुरस्कार' (2012)
➤ पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा 'कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार (2012)
➤ महाराष्ट्र शासनाचा ' अहिल्याबाई होळकर पुरस्कार' (2010)
➤ दैनिक लोकसत्ताचा 'सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार
➤ पुणे विद्यापीठाचा 'जीवन गौरव पुरस्कार' (2008)
➤ आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (1996)
➤ सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
➤ राजाई पुरस्कार
➤ शिवलीला महिला गौरव पुरस्कार
➤ 'सामाजिक सहयोगी पुरस्कार' (1992)
सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला 'मी सिंधुताई सपकाळ' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर भार्गव फिल्म्स अॅन्ड प्रॉडक्शनचा 'अनाथांची यशोदा' या नावाचा अनुबोधपट 2014 साली प्रदर्शित झाला आहे.(''Sindhutai Sapkal'')
0 Comments
🚫 Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Please do not enter any spam links in comment box