रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी
वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात कडक निर्बंध लागू
Maharashtra govt's fresh Covid rules
https://www.mahadigitalmagzine.com/2022/01/maharashtra-govts-fresh-covid-rules.html
राज्यात आता दिवसा जमावबंदी, तर रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त रात्री कोणालाही फिरता येणार नाही. खासगी कार्यालयांनाही ५० टक्के कर्मचारी उपस्थितीची अट लागू करण्यात आली आहे. याशिवाय शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. मॉल्स, जलतरण तलाव, केशकर्तनालये तसेच सार्वजनिक व खासगी कार्यक्रमांवरही बंधने आणण्यात आली आहेत. रविवारी मध्यरात्रीपासून हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
सोमवारपासून दिवसा पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांचा •जमाव करण्यास मनाई करण्यात आली आहे. शाळा-महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. याशिवाय, मैदाने, उद्याने, पर्यटनस्थळांसह स्विमिंग पूल, जिम, स्पा पुढील सूचना येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. Maharashtra govt's fresh Covid rules
🔻 नवे निर्बंध पुढीलप्रमाणे
➤ पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत पाच किंवा त्याहून अधिकच्या जमावाला बंदी.
➤ रात्री संचारबंदी लागू.
➤ अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत फिरण्यास बंदी.
➤ सरकारी कार्यालयांत कार्यालय प्रमुखांच्या लेखी परवानगीशिवाय अभ्यागतांना बंदी, ऑनलाईन बैठका, गर्दी टाळण्यासाठी कार्यालयीन वेळांमध्ये बदल.
➤ खासगी कार्यालयांत लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच परवानगी; ५० टक्के क्षमतेने काम चालवावे लागणार. २४ तास शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी.
➤ लग्न सोहळे कमाल उपस्थिती ५०
➤ अंत्यसंस्कार कमाल उपस्थिती २०
➤ राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांत कमाल उपस्थिती ५०.
➤ शाळा महाविद्यालये -१५ फेब्रुवारीपर्यंत बंद कार्यालयीन कामांना परवानगी.
➤ स्विमिंग पूल, जिम, स्पा, वेलनेस सेंटर आणि ब्युटी सलून पूर्णपणे बंद राहणार.
➤ केश कर्तनालये ५० टक्के उपस्थितीच्या अटीसह सुरू राहणार. रात्री १० ते सकाळी ७ पर्यंत बंद. ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे त्यांनाच परवानगी
➤ क्रीडा स्पर्धा नियोजित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा वगळता अन्य स्पर्धा रद्द.
➤ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी प्रेक्षकांना बंदी, खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी बायो बबल बंधनकारक.
➤ दर तीन दिवसांनी आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक...
पुढील नियम वाचन्यासाठी
नियम पाळा; अन्यथा कठोर कारवाई :
मुख्यमंत्री मी गेल्या दोन वर्षांपासून पाहतोय, राज्य सरकारने 'ब्रेक दि चेन' आणि 'मिशन बिगीन अगेन'च्या माध्यमातून वेळोवेळी नियमावल्या केल्या आणि अंमलात आणल्या आरोग्याचे नियम पाळण्यात बहुतांश नागरिक उत्सुक होते आणि आहेत आणि ते पाळतातसुद्धा: पण काही मूठभर लोकांच्या नियम न पाळण्याच्या वृत्तीमुळे आणि बेजवावदार वागण्यामुळे प्रश्न निर्माण होतो. हे यापुढे चालणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. नियम पाळलेच पाहिजेत; अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना आणि पोलिसांना दिले आहेत. हे सर्व आपल्या भल्यासाठीच आहे. लवकर या विषाणूच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी आहे हे लक्षात घ्या, असे आवाहन त्यांनी केले. आपल्याकडे साधनसामग्री पुरेशी आहे. 'Maharashtra govt's fresh Covid rules'
दोन वर्षांत सुविधांमध्ये वाढ केली आहे; पण डॉक्टर्स आजारी पडले तर नवे मनुष्यबळ कुठून आणणार? असा सवाल त्यांनी केला. आपल्याला कुठलाही लॉकडाऊन करून सगळे ठप्प करायचे नाही. प्रत्येकाने आता ही लढाई अंतिम आहे आणि हा शेवटचा घाव कोरोनावर करायचाच अशा निश्चयाने नियम पाळायचे आहेत. आपल्याला काम बंद करायचे नाही, तर गर्दी बंद करायची आहे. रोजी रोटी बंद करायची नाही, जीवन थांबू द्यायचे नाही; पण काही बंधने पाळून या विषाणूपासून राज्य कायमचे मुक्त करायचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचीही तरतूद करण्यात आली आहे. कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने निर्बंध अधिक कडक होणार असल्याची चर्चा होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टास्क फोर्सची चर्चा करून याबाबत निर्णय घेणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आधीच स्पष्ट केले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी शनिवारी या निर्बंधांना मान्यता दिली. ''Maharashtra govt's fresh Covid rules''
0 Comments
🚫 Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Please do not enter any spam links in comment box