राज्यातील महाविद्यालये पंधरा फेब्रुवारीपर्यंत बंद
Colleges in Maharashtra state
https://www.mahadigitalmagzine.com/2022/01/colleges-in-maharashtra-state-closed.html
अध्यापनासह परीक्षाही ऑनलाईन उदय सामंत यांची घोषणा
राज्यातील वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवली जाणार आहेत. या काळातील अध्यापन तसेच परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. ही माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी दिली.
गेले दोन दिवस कुलगुरू आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज्यातील सर्व अकृषी, अभिमत स्वायत्त विद्यापीठे, तंत्रनिकेतन आणि संलग्न वरिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सामंत यांनी सांगितले. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या सर्व विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन हा निर्णय घेतला आहे.
१३ ऑक्टोबरपासून राज्य सरकारने महाविद्यालये ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. दोन लस घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत येण्याची परवानगी दिली. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होतो आहे. त्यामुळे हे निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
जे विद्यार्थी काही कारणांमुळे ऑनलाईन परीक्षा देऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी विद्यापीठाने योग्य तो निर्णय घ्यावा. गोंडवाना, नांदेड, जळगाव विद्यापीठांत इंटरनेटची उपलब्धता नसल्यास परीक्षा ऑफलाईन घ्याव्यात. दहावीच्या एलिमेंटरी, इंटरमिजिएट चित्रकला परीक्षाही ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.
- उदय सामंत, उच्च शिक्षणमंत्री
JOB UPDATES
0 Comments
🚫 Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Please do not enter any spam links in comment box