CoWIN वर अडीच लाखांहून अधिक मुलांची नोंदणी !
Corona vaccination for children
देशातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना 3 जानेवारीपासून कोरोनाची लस दिली जाणार आहे. कोविन अॅपवर नोंदणी सुरु झाली आहे. या वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी नाव नोंदणीला भरघोस प्रतिसाद मिळाला असून पहिल्याच दिवशी तब्बल अडीच लाखांहून जास्त नोंदणी करण्यात आली आहे.
देशातील 15 ते 18 वर्षांच्या मुलांना लस देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर त्याची तयारी प्रशासनानं पूर्ण केली आहे. ज्या मुलांचा जन्म 2007 किंवा त्यापूर्वी झाला आहे, अशी मुलं या लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. CoWIN पोर्टलवर आपला COVID-19 वॅक्सिन स्लॉट बुक करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या आयकार्डचा वापर करावा लागणार आहे. Corona vaccination for children
ज्या मुलांकडे आधार कार्ड नसेल त्यांच्या लसीकरणात अडथळा येऊ नये म्हणून आयकार्डचा वापर करण्याचा पर्याय केंद्राकडून अंमलात आणण्यात आला आहे. भारत सरकारनं 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी दोन लसींना मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसीचे दोन डोस आणि Zydus Cadila's ZyCoV-D चे तीन डोस या लसींमधून पर्याय निवडावा लागणार आहे.
कोविन पोर्टलवर अशी करा नोंदणी ?
1) कोविनच्या वेबसाईटवरून किंवा कोविन अॅपवरून लसीकरणासाठी नोंदणी करणं बंधनकारक आहे. जेणेकरून लसीकरण केंद्र, तारीख, वेळ इत्यादी माहिती तुम्हाला आधीच कळवलं जाईल.
वेबसाईट उघडल्यानंतर उजव्या कोपऱ्यातील Register / Sign in या बटणावर क्लिक करा.
3) त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल आणि त्यावर OTP येईल.
4) त्यानंतर Register for Vaccination ची विंडो दिसेल. फोटो आयडी प्रूफ, फोटो आयडी नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग आणि सहव्याधी इत्यादी माहिती इथे तुम्हाला द्यावी लागेल. त्यानंतर Register पर्यायावर क्लिक करा.
5) एका मोबाईल नंबरच्या नोंदणीत तुम्हाला तीन जणांसाठी लसीकरणाची नोंद करता येऊ शकते. त्यासाठी Add या पर्यायावर क्लिक करून पुढील नावं आणि त्यांची माहिती समाविष्ट करता येईल. 'Corona vaccination for children'
6) नाव डिलिट करण्याचाही पर्याय देण्यात आला आहे.
7) नोंदणी करण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र स्लॉट बुक करावा लागेल.
8) पिन कोड टाकल्यानंतर तुम्हाला तिथल्या लसीकरण केंद्रांची यादी दिसेल.
9) तुम्ही जिल्हावार किंवा तुमच्या शहरानुसार यादीही शोधू शकता.
10) तुम्हाला एखाद्या लसीकरण केंद्रावर स्लॉट उपलब्ध आहेत वा नाहीत, हे दिसेल. स्लॉट्स उपलब्ध असल्यास ते कोणत्या वयोगटासाठी आहेत, कोणती लस उपलब्ध आहे, हे देखील तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. "Corona vaccination for children"
11) तुमच्या वयोगटासाठी स्लॉट उपलब्ध असल्यास तुम्ही तो बुक करू शकता. तसा मेसेज तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर येईल.
0 Comments
🚫 Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Please do not enter any spam links in comment box