किमती ८ ते १० टक्के वाढणार, उत्पादन खर्च वाढल्याच्या परिणाम
इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना आणखी फटका बसेल. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने कपडे, टीव्ही, फ्रिज, मद्य, सौंदर्य प्रसाधनांसह दैनंदिन वापराच्या वस्तू ८ ते १० टक्क्यांनी महागणार आहेत.
काही महिन्यांमध्ये डिझेलच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली होती. इंधन दरवाढीमुळे पुरवठा चैनवर मोठा परिणाम झाला होता. मालवाहतुकीचा खर्च वाढला होता. परिणामी महागाईमध्ये वाढ झालेली आहे. दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती ८ ते १० % वाढणार आहे. कपडे, टीव्ही, फ्रिज, सौंदर्य प्रसाधने तसेच इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा यात समावेश आहे. किरणा माल पॅकबंद पदार्थ, पर्सनल केअर उत्पादने यासारख्या वस्तुंच्या किमती यापूर्वीच वाढलेल्या आहेत
मालवाहतुकीचा खर्च वाढला
✓ इंधन दरवाढीचाही यावर परिणाम झाला. सप्टेंबरमध्ये इंधन आणि उर्जा विषयक महागाई २४.८ टक्के होती.
✓ त्यातच लॉजिस्टिक आणि वेअर हाउसिंगचाही खर्च वाढला आहे. मालवाहतुकीचे भाडे उच्चांकी पातळीवर होते.
एसी, फ्रिज, वॉशिंग मशिन, मायक्रोवेव्ह ओव्हन इत्यादी घरगुती उपकरणांच्या किमती ५ ते ६ टक्क्यांनी वाढू शकतात.
कच्चा माल महागला
काच, कापूस, स्टील, इलेक्ट्रॉनिक चिप तसेच आवश्यक रासायनिक कच्चा माल अतिशय महाग झाला आहे. सुती धाग्याच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० % वाढल्या आहेत. त्यामुळे कापड उद्योगाला मोठ्या प्रमाणावर फटका बसणार आहे.
घाऊक महागाई वाढली
गेल्या सहा महिन्यांमध्ये घाऊक महागाईचा दर वाढलेला आहे. किरकोळ महागाई कमी झालेली आहे. तरीही थोक महागाईमुळे किमतीत वाढ करण्यात येणार आहे. कंपन्यांच्या वाढलेल्या उत्पादन खर्चाचा अंदाज थोक महागाईवरून येतो.
मागणीवर परिणाम
उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे कंपन्यांकडून उत्पादनांच्या किमतीत वाढ करण्यात येणार आहे, दसरा, दिवाळी, छठ पूजा इत्यादी सणासुदीच्या दिवसांमध्ये यावेळी मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात येत आहे. किमती वाढल्यास मागणीवर परिणाम होऊ शकतो.
0 Comments
🚫 Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Please do not enter any spam links in comment box