जाहिरातीसाठी संपर्क

ऑस्ट्रेलियाने पटकावले टी-20 वर्ल्ड कपचे पहिले विजेतेपद

ऑस्ट्रेलिया टी-२० चा नवा 'बॉस'

वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर ८ विकेट्सनी मात

Australia 


संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड २० पटकांत ४ बाद १७२ धावा. (केन विल्यम्सन ८५, मार्टिन गुप्टिल २८. जोश हेझलवूड ३/१६) ऑस्ट्रेलिया १८.५ षटकांत २ बाद १७३ धावा. (डेव्हिड बॉर्नर ५३, मिचेल मार्श नाबाद (७७. ट्रेंट बोल्ट २/१८)

दुबईच्या मैदानावर रंगलेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला ८ गड्यांनी धूळ चारत विश्वविजेतेपद पटकावले. टी-२० प्रकारात प्रथमच ऑस्ट्रेलिया संघ विश्वविजेता ठरला. केन विल्यम्सनच्या वादळी ८५ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने २० षटकांत ४ बाद १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने दमदार फलंदाजी केली. डेव्हिड बॉर्नर (५३) आणि मिचेल मार्श (७७) यांनी दमदार अर्धशतके ठोकली. मॅक्सवेलने चौकार ठोकत ऑस्ट्रेलियाचे स्वप्न पूर्ण केले.

दुबईच्या मैदानावरील फ्रेश खेळपट्टीवर न्यूझीलंडने दिलेल्या १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ॲरोन फिंच (५) याने सेमीफायनलप्रमाणे फायनलमध्येही निराशा केली. ट्रेंट बोल्टने त्याला तंबूत धाडले; पण डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी कोणतेही दडपण न घेता धावा झोडण्याचे म सुरू ठेवले. दोघांनी पॉवरप्लेमध्ये ४३ धावा केल्या. सातवे पटक संपताना संघाचे अर्धशतक फलकावर लागले. सलामीवीर वॉर्नरने ३४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. बाराव्या षटकात संघाचे शतक फलकावर लागले. ही जोडी फोडण्यासाठी विल्यम्सनने आपला स्टार गोलंदाज ट्रेंट बोल्टला कामाला लावले बोल्टनेही कर्णधाराला निराश केले नाही. त्याने दुसऱ्याच चेंडूवर वॉर्नरचा त्रिफळा उडवला. त्याने ३८ चेंडूंत ५३ धावा केल्या. वार्नर बाद झाल्यानंतर पुढच्याच घटकांत माशनेही आपले अर्धशतक ओलांडले. यानंतर त्याने आक्रमक खेळ केला. मॅक्सवेलला साधीला घेत त्याने १९ च्या षटकातच विजयी लक्ष्य गाठले.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अंरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मार्टिन गुप्टिल आणि डॅरेल मिशेल यांनी न्यूझीलंडसाठी सलामी दिली. सेमीफायनलचा नायक ठरलेला डॅरेल मिशेल या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. चौथ्या घटकात वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने मिशेलला (११) यष्टीपाठी झेलबाद केले. मिशेलनंतर कर्णधार केन विल्यम्सन मैदानात आला.

 नवव्या घटकात न्यूझीलंडने अर्धशतक पूर्ण केले. यानंतर विल्यम्सनने गुप्टिलसह धावा जमवल्या झम्पाने १२व्या षटकात गोलंदाजीला येत संघ खेळणाऱ्या गुप्टिलला तंबूत पाठवले. गुप्टिलने २८ धावा केल्या. त्याच्यानंतर ग्लेन फिलिप्ससह विल्यम्सन स्थिरावला. पुढच्या पटकात त्याने आक्रमक पवित्रा धारण करत मॅक्सवेलला दोन षटकार खेचले. याच षटकात त्याने अर्धशतक पूर्ण केले. स्टार्कने १६वे पटक टाकले. या षटकात विल्यम्सनने आक्रमक फटकेबाजी करत २२ धावा लुटल्या. १६ षटकांत न्यूझीलंडने २ बाद १३६ धावा केल्या. फटकेबाजीमुळे विल्यम्सन फिलिप्स यांच्यात अर्धशतकी ●भागीदारी पूर्ण झाली. १८व्या षटकात फिलिप्स (१८) आणि (22) विल्यम्सनला (८५) माघारी धाडले. • विल्यम्सनने आपल्या खेळीत १० चौकार आणि ३ षटकार ठोकरने. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला हात खोलू दिले नाहीत. २० षटकांत न्यूझीलंडने ४ बाद १७२ धावा केल्या, नौशम १३, तर सेईफर्ट ८ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाच्या हेझलवूडने १६ धावांत ३ बळी घेतले.


  हेही वाचा : 

आता अर्ध्या तासात जमिनीची मोजणी

thumsup


👉 टेलीग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा )👈

Post a Comment

0 Comments