PM Kisan Yojana New Rules : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतंर्गत गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्यांना एक वर्षात तीन टप्प्यांत म्हणजेच दर चार महिन्यांनी 2000 रुपये दिले जाते. म्हणजेच एका वर्षात 6000 रुपये मानधन मिळते. तसेच देशातील सुमारे 12 कोटी व महाराष्ट्रातील 1 कोटी 9 लाख 33 हजार 298 या योजनेचा समाविष्ट आहेत.
मधल्या काळात अपात्र शेतकऱ्यांनी व लोकांनी लाभ घेतल्याचे आढळून आले. अशा अपात्र लोकांवर कारवाई देखील सरकारकडून करण्यात येत आहे. या अपात्र लोकांनी लाभ घेतलेली रक्कम वसूल करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत झालेले बदल आपण जाणून घेऊया..!
• पीएम किसान योजनेतील पात्र शेतकऱ्यांना आता आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे.
• तसेच शेतकऱ्यांना आधार क्रमांक बॅंक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे.
• ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण व आधार क्रमांक बॅंक खात्याशी लिंक केलेला नसेल, त्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.
• जर आपण आधार प्रमाणीकरण केले असेल आणि आधार क्रमांक बॅंक खात्याशी लिंक केलेला नसेल तरी देखील आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. ('pm kisan yojana news')
पीएम किसान योजनेत महाराष्ट्रातील सुमारे 21 लाख शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण व आधार क्रमांक बॅंक खात्याशी लिंक केलेला नाही. काही शेतकऱ्यांनी आधार कार्ड न दिल्यामुळे त्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही. ("pm kisan yojana new update")
योजनेचा 11 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचा आधार क्रमांक बॅंक खात्याशी लिंक नसेल त्या शेतकऱ्यांना 11 वा हप्ता मिळणार नाही. तर राज्यातील शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर बॅंकेत जाऊन आधार क्रमांक बॅंक खात्याशी लिंक करून घ्यावं.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत झालेले हे बदल प्रत्येक शेतकऱ्याला माहित असणं गरजेचं आहे आपण थोडंस सहकार्य ही माहिती पुढे शेतकऱ्यांना नक्की शेअर करा. (pm kisan yojana new rules 2022)
0 Comments
🚫 Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Please do not enter any spam links in comment box