न्यूझीलंडचा संघ बलाढ्य या श्रेणीत कधीही गणला जात नाही. तरीही या संघाने आयसीसीच्या सलग तीन स्पर्धाची अंतिम फेरी गाठली आहे. मि. जंटलमेन समजल्या जाणाऱ्या केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील संघाने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत गाठलेली ही उंची कुणालाही हेवा वाटेल अशीच आहे.
New Zealand |
न्यूझीलंडने बुधवारी अबुधाबीच्या शेख झायद क्रिकेट स्टेडियमवर आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धे च्या उपांत्य सामन्यात इंग्लंडला पराभूत करीत अंतिम फेरी गाठली. किवी संघ पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. न्यूझीलंड संघ २०१९ मध्ये झालेल्या ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धे तील उपविजेते होते. तर, आयसीसी कसोटी जागतिक
अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद त्यांनी मिळवले आहे. आता टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्यांची गाठ शेजारी ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही संघांनी यापूर्वी टी-२० विश्वचषक जिंकलेला नाही. त्यामुळे या संघांमध्ये चांगली चुरस पहायला मिळेल, यंदा या स्पर्धेला नवीन विजेता मिळेल.
इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यात डॅरेल मिचेलने नाबाद ७२ धावांची खेळी करीत संघाला अंतिम फेरीत पोहोचवले. मिचेल म्हणाला की, गेल्या काही वर्षांत संघाने मिळवलेल्या गोष्टींवर खेळाडूंना गर्व आहे. विश्वचषक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणे ही मोठी गोष्ट आहे. या स्पर्धेचा भाग झाल्याने मी आनंदी आहे. न्यूझीलंडकडून खेळतो आहे यासाठी मी स्वतःला नशीबवान समजतो. मी वयाच्या २७व्या वर्षी पदार्पण केले. स्थानिक क्रिकेटमध्ये अनेक चढ-उतार पाहिले आणि त्यामधून शिकलो. मिचेलने गुप्टिल सोबत फलंदाजीस येत आक्रमक खेळ केला. यासोबतच ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी यांचे योगदानदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. फर्ग्युसनच्या जागी संघात आलेला ॲडम मिल्ने याने देखील चमक दाखवली.
"New Zealand in final T20 World cup"
विल्यम्सनच्या नेतृत्वाखाली संघाची उंच भरारी
केन विल्यम्सनने संघाची धुरा सांभाळल्यानंतर खेळाचा स्तर आणखीन वाढला आहे. शांत आणि संयमी कर्णधार म्हणून नेहमी विल्यम्सनकडे पाहिले जाते. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने आपली छाप पाडली आहे. २०१९ मध्ये किवी संघाला इंग्लंडने फायनलमध्ये नमविले. यानंतर
New zealand 3times in word cup
पारंपरिक कसोटी प्रारूपात त्यांनी जागतिक अजिंक्यपद पटकावित अनेक वर्षांनी आयसीसी स्पर्धेचे जेतेपद मिळवले. त्यापूर्वी त्यांनी आयसीसी 'नॉकआऊट' स्पर्धेत बाजी मारली होती. आता त्यांना एकाच वर्षात दोन आयसीसी जेतेपद मिळवण्याची संधी आहे. २०१५ च्या विश्वचषक स्पर्धे च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघ एकमेकांसमोर होते तेव्हा ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती. त्यामुळे यावेळी विल्यम्सनच्या नेतृत्वाखाली संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
0 Comments
🚫 Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Please do not enter any spam links in comment box