Source by -Google |
टी-20 वर्ल्कप स्पर्धेत भारताविरुद्धच्या सलामीच्या लढतीसाठी पाकिस्तान क्रिकेट संघाने आपल्या अंतिम 12 खेळाडूंची घोषणा एक दिवस आधीच केलीय. पाकिस्तान क्रिकेट संघ त्यातून 'प्लेइंग इलेव्हन' निवडणार आहे.
दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर आज सायंकाळी भारत-पाक या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये 'हायहोल्टेज' सामना रंगणार आहे. पाक आपला संघ जाहीर केला असला, तरी भारताने अजून अंतिम 12 जणांचा संघ जाहीर केलेला नाही.
पाक संघ बाबर आझमच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. संघात अखेरच्या टप्प्यात अनुभवी अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकचाही समावेश केला होता. आता 12 सदस्यीय संघातही त्याची वर्णी लागली आहे.
खरं तर नाणेफेकीच्या वेळी अंतिम 'प्लेइंग इलेव्हन' जाहीर केली जाते. मात्र, पाकिस्तानी संघाने एक दिवस आधीच आपला संघ जाहीर केला आहे. अर्थात, पाकिस्तानने जाहीर केलेला हा संघच अंतिम आहे, असे म्हणता येणार नाही. अखेरच्या टप्प्यात त्यात ते बदलही करु शकतात.
टीम इंडिया अजिंक्य
आतापर्यंत टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाचही वेळा टीम इंडियानेच बाजी मारलीय. यंदा भारतीय संघ विजयाचा षटकार मारण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरेल. दुसरीकडे पाक संघ पराभवाचा इतिहास सुधारण्यासाठी प्रयत्नशील असेल.
पाकिस्तानचा संघ
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर झमान, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक, असिफ अली, इमाद वसिम, शादाब खान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ, हैदर अली.
0 Comments
🚫 Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Please do not enter any spam links in comment box