जाहिरातीसाठी संपर्क

राज्यातील शाळांना दिवाळीची सुटी जाहीर, शिक्षणमंत्र्यांकडून घोषणा.!

 

Diwali Holiday Schools


 कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा 4 ऑक्टाेबरपासून सुरु झाल्या होत्या. मात्र, दिवाळीनिमित्त राज्य सरकारने शाळांना 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2021 पर्यंत सुटी जाहीर केलीय. कोविडमुळे अनेक दिवस वाया गेल्याने सुट्यांचा कालावधी कमी करण्यात आलाय..  

 दरम्यान, मुंबईतील शाळांना 1 ते 20 नोव्हेंबर दरम्यान 'दिवाळीची सुटी' देण्यात आली आहे. शिक्षण निरीक्षकांनी शाळांना तसे आदेश दिले आहेत. 'Diwali Holiday Schools in Maharashtra declared'


 राज्यातील शाळांना सुट्ट्या जाहीर न झाल्याने विद्यार्थी-पालक व शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. कोरोनामुळे अनेकांना प्रवास करता आलेली नव्हता. राज्यात बऱ्यापैकी अनलाॅक झाले असले, तरी सुट्या जाहीर होत नसल्याने अनेकांना प्रवासाचे नियोजन करता येत नव्हते.

 

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिवाळीच्या सुटीबाबत ट्विट करुन माहिती दिली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांना 10 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुटी असेल. या काळात ऑनलाइन अध्यापनही बंद राहणार आहे.

                                                                           




Post a Comment

0 Comments